Psalms 50

आसाफाचे स्तोत्र.

1थोर परमेश्वर देव, बोलला आहे.
आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत हाक मारली.
2सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून
देव प्रकाशला आहे.

3आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही,

त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे,
आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
4त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली,
म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.
5देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा.
ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”

6आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.

कारण देव स्वतः न्यायधीश आहे.

7हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेल,

मी देव आहे, तुमचा देव आहे.
8मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही.
तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहे,

9मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही.

किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.
10कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे,
हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
11उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे
आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.

12मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही,

कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.
13मी बैलाचे मांस खाईल का?
मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?

14देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करा,

आणि परत्पराकडे आपले नवस फेडा.
15तुम्ही संकटात असाल तेव्हा मला हाक मारा
आणि मी तुम्हाला वाचवेल, आणि नंतर तुम्ही मला गौरव देणार.

16देव दुष्ट लोकांना म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे?

आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?
17कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस,
आणि माझी वचने झुगारून देतोस?

18तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता.

तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
19तू वाईटाला आपले मुख देतोस
आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.
20तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलतात.
तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.

21तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसलो

मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले,
परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.
22तुम्ही लोक देवाला विसरला आहात.
मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.

जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो,

आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो,
त्याला मी देवाचे तारण दाखवेल.
23

Copyright information for MarULB